पाउस दाटलेला माझ्या घरावरी हा ,
दारास भास आता हळुवार पावलांचा .
पुन्हा पावसालाच सांगायचे
कुणाला किती थेंब वाटायचे
मोठ्या मोठ्या ढगांनी वाटत ,
अगदी खाली यावं
ढगालाच तोंड लाऊन त्यातल पाणी पिऊन घ्यावं .
भिजण्यासाठी गच्चीत जावं ,
समोरच्या गच्चीत ती असावी
दोन्ही गच्च्यांमध्ये तेव्हा आणखी कोणीच माणस नसावी .
मेघ गर्जतो...गर्जतो
काळजाचे होते पाणी...
अन डोळ्यांत अजुनही .....
तुझ्या ओठांतली गाणी
शिक्षक - भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो?
बराच वेळ विचार करून बंड्याने उत्तर दिले,
.
"जमिनीवर!!"
पाऊस तुझा माझा डोळ्यातुनी दाटला...
संपता मर्यादा त्याची गालावरुनी ओघळला ...
पापण्याचे सखे हे मेघ असे का दाटले...
विरह सहन करुनी गडद ते गरजले ...
अता दुरावा त्याग पावसा
सोड तुझा वैताग पावसा..
तुझ्यामुळे निवळेल तिचाही
माझ्यावरचा राग पावसा..
तुझा तळहात टेकव माझ्या हातावार ,
पाउस कोसळेल सुकलेल्या झाडावर ,
स्पर्शाने तुझ्या उजळेल काळी रात्र ,
चंद्र सुद्धा आभाळ फाडून चमकेल लाटालाटावर
डोळ्यांतून पावसाच्या
धो धो कोसळतात सरी...
तुझ्या आठवांचे ढग
ईथेच आहेत कुठेतरी...
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ....
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !
प्रेम आणि पाऊस दोन्हीही जवळ-जवळ सारखेच असतात..
आणि अविस्मरणीय असतात..
फरक एवढाच की..
पाऊस सोबत राहून अंग भिजवतो..
आणि प्रेम दूर राहून डोळे..
थंड हवा, ढगाळ आकाश,
धुक्यात डोंगर आणि मातीचा गंध,
कड़क चहा, चिंब भिजायला तयार रहा,
पहिल्या पावसाच्या पहिल्या शुभेच्छा !
पाऊस पडू लागला की मनाला..
मनापासून भिजावंसं वाटतं...
शब्दांनाही मनात मग..
कवितेसाठी रुजावसं वाटतं...
ये रे ये रे पावसा।
तुला देतो पैसा।
पैसा झाला खोटा।
पाऊस आला मोठा।
मुसळधार पाऊस......
खिडकित उभी राहून पहा...
बघ माझी आठवण येते का..