सचोटीचा मनुष्य निर्माण करणे हीच परमेश्वराची उदात्त कलाकृती होय.
सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे.
ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.
सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून,
वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे
सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या-वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो,
परंतु स्वत: मात्र पूर्णपणे शुध्द राहातो,
अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य घडविले पाहिजे.
स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो,
तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो.
स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.
कधी हसवतात ,
कधी रडवतात
क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन,
पानांसारखे पडत असतात