तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.
तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल....
माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात ..
.पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते..
तुझ्याशिवाय जगण काय जगण्याचा स्वापनसूद्धा पाहु सकत नाही,
श्वासाशिवाय काही क्षण मी जगू सकतो,
पण तुझ्याशिवाय एकही क्षण मी जगू सकत नाही.
पान जरी कोरं असलं,
तरी पानालाही भावना असतात.
मन जरी वेडं असलं,
तरी मनालाही भावना असतात.
पानाच्या भावना कोणालाच कळत नाहीत,
मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत.
मनं हे असचं असतं,इकडून तिकडे बागडत असतं.
मनाला काही बंधनं असतात,म्हणुन तर ह्र्दयात स्पंदनं असतात...
प्रत्येक राजा लहाणपणी रडका असतो.
कुठलीही इमारत सुरूवातीला साधा नकाशा असते.
तुम्ही आज कुठे आहात हे महत्त्वाचे नाही.
उद्या कुठे पोचता हे महत्त्वाचे आहे
तुझं दूर जाणं ही एक शोकांतिकाच आहे
माझ्या मनासाठी अजूनही काही ओले
बंध बाकी आहेत स्पंदनाच्या तीरासाठी
डोळे पाण्याने भरून आलेले आणि
मनात आठवणींचे आभाळ दाटलेलं
झोकाळून गेल्या चेहऱ्यावर माझ्या
ठार होते टोकणार्या वेदनांचे साचलेले
जाताना ती म्हणाली .......
चिंता करू नकोस जीवनाच्या एका वळणावर आपण पुन्हा एकदा भेटूया,
स्वप्नाताला संसार आपण प्रत्यक्षा त थाटूया
सात जन्म गेले तरी बेहत्तर हि दुनिया गोल आहे,
जीवनाच्या या वळणावर आपण नक्की भेटूया....
जीवनाच्या मैफिलीत आज सारी गणिते उजवी ठरली
बेरीज आणि वजाबाकी आज श्वासांमध्ये अडकून पडली
माझ्यापासून तुझ्यापर्यंतच अंतर जवळ वाटल,
तुझ्याकडे धाव घेतली तर ते फार लांब वाटल
वाहत्या वार्याला सखे
मुठीत धरायला जाऊ नको
प्रेमाच्या विषारी बीजाला
हॄदयात पेरायला जाऊ नको
प्रेमात जरा रागावल्याशिवाय
प्रेमाला गोडी येणार नाही
आणि रागावून दूर गेल्याशिवाय
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.
फुला सारखी हसत राहिलीस .............. तर
मी खुश आहे,मोकळेपणाने जगत
राहलीस .............. तर मी खुश आहे,
मी असं नाही म्हणत कि रोज मला भेट..........
दिवसातून फक्त एकदा जरी माझी आठवण
काढलीस ............ तर मी खुश आहे
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर..........
तु नक्किच आहेस....
पण.............
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे.......
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात
सगळेच अश्रु दाखवायचे नसतात
सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात
स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन
स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात
तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात
भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला
ह्दयीची हाक लागते
माझ्या डोळ्यातील कधीतरी वाचून पहा भाव,
त्यात फक्त दिसेल तुला प्रिये तुझ नाव.
विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही!
दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही !
पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !
आठवण आली नाही असं कधी झालच नाही !
आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही..
शोधतोय..
आयुष्याच्या या वाटेवर,
मी माझी वाट शोधतोय..
वाहणारे अश्रु येतात जिथुन,
मी तो पाट शोधतोय..
मला व्यापलं आहे जीवनाने,
अन् मी माझी जागा शोधतोय..
नात्यांच्या या रेशिम बंधातुन,
मी माझा धागा शोधतोय..
मनात जे भरुन आहेत कधीचे,
मी त्या श्वासांना शोधतोय..
जगण्याची जे उर्मी देतात,
मी त्या ध्यासांना शोधतोय..
खरं सांगायचं तर मी,
माझ्या हरवलेल्या स्वप्नांना शोधतोय.
Dil Ki Baat Jaanta Nhi Koi
Kehna In Aankho Ka Maanta Nhi Koi
Hum To Jaan B Apni Luta De Khusi Se
Par Ehmiyat Is Jaan Ki Jaanta Nhi Koi…